कोतवाल आत्‍महत्‍या प्रकरणात आणखी दोघांची नावे समोर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 27 जूनला मोताळा तहसीलदारांच्या निवासस्थानीच कोतवाल विष्णू सुरपाटणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या खिशात मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बोराखेडी पोलिसांनी तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या नंदकिशोर पाखरे (40) या शिपायास अटक करून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पाखरेची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 27 जूनला मोताळा तहसीलदारांच्या निवासस्थानीच कोतवाल विष्णू सुरपाटणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्‍यांच्या खिशात मृत्‍यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बोराखेडी पोलिसांनी तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या नंदकिशोर पाखरे (40) या शिपायास अटक करून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पाखरेची प्रकृती बिघडल्याने त्याला बुलडाणा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. काल 30 जूनला पाखरे याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 14 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
याप्रकरणातील अन्य दोघांची नावे समोर आली असून, ते दोघेही तहसील कार्यालयातील कर्मचारीच आहेत. त्यापैकी एकाचे निलंबन करण्यात आले आहे. कोतवाल विनोद अनुकरणे आणि शिपाई संजय पारखेडकर या दोघांचीही नावे सुरपाटणेंच्‍या सुसाईड नोटमध्ये होती. पैकी अनुकरणे याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोघेही सध्या फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे.