कोथिंबीर १२० रुपये किलो; टोमॅटो ७० रुपये किलो! मात्र दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमीच!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन महिन्यांपूर्वी मातीमोल झालेल्या टोमॅटोचे भाव आता चांगलेच वाढले आहेत. चिखली, खामगाव, बुलडाण्याच्या बाजारात टोमॅटोला ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळत आहे. कोथिंबीरचे भावसुद्धा गगनाला भिडले असून, एका किलोसाठी १२० ते १५० रुपये मोजावे लागत आहेत. कोथिंबीर सोबतच कांदे, कारले, हिरवी मिरची, शेपू या भाज्यांचेही भाव वाढल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त …
 
कोथिंबीर १२० रुपये किलो; टोमॅटो ७० रुपये किलो! मात्र दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमीच!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दोन महिन्यांपूर्वी मातीमोल झालेल्या टोमॅटोचे भाव आता चांगलेच वाढले आहेत. चिखली, खामगाव, बुलडाण्याच्या बाजारात टोमॅटोला ८० रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव मिळत आहे. कोथिंबीरचे भावसुद्धा गगनाला भिडले असून, एका किलोसाठी १२० ते १५० रुपये मोजावे लागत आहेत.

कोथिंबीर सोबतच कांदे, कारले, हिरवी मिरची, शेपू या भाज्‍यांचेही भाव वाढल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. मात्र अतिवृष्टीने भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाल्याने या भाववाढीचा फायदा शेतकऱ्यांना कमीच होत आहे. सप्टेंबर महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यापाठोपाठ १६ सप्टेंबरच्या रात्रीचा पाऊस यामुळे शेपू, कोथिंबीर, पालक, मेथी या पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या मालाची आवक कमी झाली आहे. मेथीला ८० रुपये, पालक १०० रुपये, हिरवी मिरची ५० रुपये, कारले ८० रुपये असा दर भाजीपाल्याला मिळत आहे. दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने भाजीपाल्याचे नुकसान होते. त्यामुळे या महिन्यात भाजीपाल्याचे दर वाढतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.