कोरोनाची आकडेवारी मुद्दामहून कमी दाखवताहेत; आमदार श्वेताताई महाले यांचा प्रशासनावर आरोप

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोनाबाधित निगेटिव्ह, पॉझिटिव्ह ,बरे झालेले रुग्ण आणि मृत्यूसंख्या यांची जिल्ह्यात होणारी प्रसिद्धी आणि राज्य सरकारकडे सादर करण्यात येत असलेल्या आकडेवारीत फार मोठी तफावत असून, त्यामुळे जिल्ह्याला आकडेवारीच्या तुलनेत कमी सुविधा मिळत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फार मोठा फटका जिल्ह्याला बसत असल्याचा घणाघाती आरोप आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील कोरोनाबाधित निगेटिव्ह, पॉझिटिव्ह ,बरे झालेले रुग्ण आणि मृत्यूसंख्या यांची जिल्ह्यात होणारी प्रसिद्धी आणि राज्य सरकारकडे सादर करण्यात येत असलेल्या आकडेवारीत फार मोठी तफावत असून, त्यामुळे जिल्ह्याला आकडेवारीच्या तुलनेत कमी सुविधा मिळत आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभाराचा फार मोठा फटका जिल्ह्याला बसत असल्याचा घणाघाती आरोप आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकाव्दारे केला आहे.

आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाच्या संदर्भात जाहीर होणारी आकडेवारी मुद्दामहून कमी दाखविली जात असून, त्यामुळेच जिल्ह्याला कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मिळणाऱ्या सुविधा , साहित्य व निधी कमी मिळत आहे. त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. वानगीदाखल आमदार सौ. महाले पाटील यांनी बुलडाणा जिल्ह्याची दररोजची आणि राज्याची रोजची जाहीर झालेली आकडेवारीच पुरावा म्हणून दिली आहे. हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून कदाचित आघाडी सरकारच्या सांगण्यावरूनच मुद्दामहून आकडेवारी कमी दाखविली तर जात नाही ना ? अशी शंका सुद्धा आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त करून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देऊन माहिती रोज अद्यायवत करण्याचे पत्र सुद्धा जिल्हाधिकारी यांना आमदार महाले पाटील यांनी दिले आहे.