कोरोनाची उसळी!; एकाच दिवसांत २० पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने एकाएकी उसळी घेतल्याचे चित्र आज, 30 ऑगस्टला दिसून आले. जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 20 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. यात एकट्या कोयाळी दहातोंडे (ता. लोणार) येथील 6 रुग्णांचा समावेश आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 792 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 772 अहवाल कोरोना …
 
कोरोनाची उसळी!; एकाच दिवसांत २० पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने एकाएकी उसळी घेतल्याचे चित्र आज, 30 ऑगस्‍टला दिसून आले. जिल्ह्यात दिवसभरात तब्‍बल 20 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत. यात एकट्या कोयाळी दहातोंडे (ता. लोणार) येथील 6 रुग्‍णांचा समावेश आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 792 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 772 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 20 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 7 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 482 तर रॅपिड टेस्टमधील 290 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा शहर : 6, देऊळगाव राजा तालुका : दगडवाडी 1, चिखली तालुका : केळवद 1, पेठ 1, चिंचखेड 1, कोलारा 1, बुलडाणा तालुका : अंबोडा 1, सिंदखेड राजा तालुका : आंचली 1, लोणार तालुका : कोयाळी दहातोंडे 6, वाडी वाघोली 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 20 रुग्ण आढळले आहे.

44 रुग्‍णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 689428 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86696 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1150 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87413 कोरोनाबाधित रुग्ण असून,सद्यःस्थितीत कोविडचे 44 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.