कोरोनाची ‘पॉझिटिव्ह’ बातमी! रुग्ण तीनशेपेक्षा कमी!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. आज, 28 मे रोजी ही संख्या पावणेतीनशेच्या आसपास असून, 24 तासांत एकच रुग्ण दगावल्याने 28 मे ही तारीख जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना दिलासा देणारी ठरली आहे.आज जिल्ह्यात 279 पॉझिटिव्ह आढळले आहेत. संग्रामपूर तालुका 51 रुग्णांसह आघाडीला …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्‍णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसून आली. आज, 28 मे रोजी ही संख्या पावणेतीनशेच्या आसपास असून, 24 तासांत एकच रुग्ण दगावल्याने 28 मे ही तारीख जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांना दिलासा देणारी ठरली आहे.
आज जिल्ह्यात 279 पॉझिटिव्ह आढळले आहेत. संग्रामपूर तालुका 51 रुग्णांसह आघाडीला असून जिल्ह्यातील एकमेव हाफ सेंच्युरी त्याने झळकावली आहे. एरवी शतकामध्ये खेळणाऱ्या बुलडाणा तालुक्यातील रुग्णसंख्या केवळ 38 इतकी असून, त्याखालोखाल मेहकर तालुका 33 रुग्‍णांसह आहे. खामगाव 23, शेगाव 12, देऊळगाव राजा 19, चिखली15, मलकापूर 16, नांदुरा 10, लोणार 8, मोताळा 11, जळगाव जामोद 27, सिंदखेड राजा 17 या तालुक्यांतील कोरोना रुग्णांची संख्या आटोपशीर अशीच आहे. गत्‌ 24 तासांत बुलडाण्याच्‍या महिला रुग्णालयातील एकमेव रुग्ण दगावला आहे. तो चिखली येथील 40 वर्षीय पुरुष होता.

5196 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5475 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 5196 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 279 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 166 व रॅपिड टेस्टमधील 113 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 2079 तर रॅपिड टेस्टमधील 3117 अहवालांचा समावेश आहे.

3570 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आज 810 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 470478 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 80189 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1389  नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 84349 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 3570 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. आजपर्यंत 590 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.