कोरोनाची वर्षपूर्ती… जिल्हा कोरोनामुक्‍त झाला होता, काही लोकांनी हात धरून आणत मानगुटीवर बसवले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 23 मार्चला कोरोनाला काल, 23 मार्चला वर्ष पूर्ण झाले. या दिवशी जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. बुलडाणा शहरातील एका उर्दू शाळेतील मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. ते 23 मार्च 2020 ला पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर काहीच दिवसांत लगेच चिखली आणि देऊळगाव राजा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 23 मार्चला कोरोनाला काल, 23 मार्चला वर्ष पूर्ण झाले. या दिवशी जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. बुलडाणा शहरातील एका उर्दू शाळेतील मुख्याध्यापकाचा मृत्यू झाल्‍यानंतर त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. ते 23 मार्च 2020 ला पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर काहीच दिवसांत लगेच चिखली आणि देऊळगाव राजा शहरात कोरोनाचे रुग्ण आढळले. तीन महिन्यांच्‍या कडक लॉकडाऊन काळात सुद्धा दिवसेंदिवस रुग्णांची भर पडत होती. मार्च ते मे या दरम्यान संपूर्ण देशभरात कडक लॉकडाऊन होता. त्यानंतर अनलॉकची प्रकिया सुरू करण्यात आली होती.

जिल्हा झाला होता कोरोनामुक्त

वर्षभरात आरोग्य कर्मचारी, पोलीस, नगरपालिका प्रशासन व  स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत बुलडाणा जिल्ह्यातील रुग्णसंख्या नियंत्रणात होती. 10 ऑक्टोबर 2020  रोजी जिल्हा कोरोनामुक्त झाला होता. त्या दिवशी कोरोनाचा एकही रुग्ण जिल्ह्यात नव्हता. मात्र आनंद केवळ काही तासांपुरताच घेता आला होता. 11ऑक्टोबरपासून पुन्हा रुग्ण आढळायला सुरुवात झाली होती. फेब्रुवारी 2021 च्‍या मध्यापासून पुन्हा जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. बाधित रुग्णांचे आकडे चिंताजनक आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सध्या जिल्ह्यात संध्याकाळी 6 ते सकाळपर्यंत संचारबंदी लावावी लागली. जिल्ह्यात कालपर्यंत 31474 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, तर 25537 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कालपर्यंत 240 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. सध्या जिल्ह्यात 5697 कोरोनाबाधित रुग्ण उपचार  घेत आहेत.