कोरोनाची वाढती रुग्‍णसंख्या चिंताजनक; आज १२ “पॉझिटिव्‍ह’ आढळले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. आज, 4 ऑगस्टला 12 नवे पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, यामुळे आता रुग्णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या 43 झाली आहे. 4 रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1617 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी …
 
कोरोनाची वाढती रुग्‍णसंख्या चिंताजनक; आज १२ “पॉझिटिव्‍ह’ आढळले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात पुन्‍हा एकदा कोरोना रुग्‍णसंख्या वाढताना दिसत आहे. आज, 4 ऑगस्‍टला 12 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली असून, यामुळे आता रुग्‍णालयांत उपचार घेणाऱ्यांची संख्या 43 झाली आहे. 4 रुग्‍णांना दिवसभरात डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1617 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1605 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 12 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 2 व रॅपिड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 295 तर रॅपिड टेस्टमधील 1310 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली शहर : 5, चिखली तालुका : हातणी 1, दिवठाणा 1, देऊळगाव राजा तालुका : शिवणी आरमाळ 2, दिग्रस 1, बुलडाणा शहर :1, खामगाव तालुका : घाटपुरी 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 12 रुग्ण आढळले आहेत.

एकूण बाधितांचा आकडा 87290 वर
आजपर्यंत 645649 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86575 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1600 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87290 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 43 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.