कोरोनाचे जिल्ह्यात चार नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 ऑगस्टला कोरोनाचे नवे 4 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, एका रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1806 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1802 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 4 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 ऑगस्‍टला कोरोनाचे नवे 4 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, एका रुग्‍ण बरा झाल्याने त्‍याला डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1806 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1802 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 4 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 278 तर रॅपिड टेस्टमधील 1524 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : भोरसा भोरसी 1, देऊळगाव घुबे 1, बुलडाणा तालुका : अंभोडा 1, संग्रामपूर तालुका : लाडनापूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 4 रुग्ण आढळले आहे. आज 1 रुग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

35 रुग्‍ण घेताहेत उपचार
आजपर्यंत 644044 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86571 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1785 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87278 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 35 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.