कोरोनाचे तांडव! 368 पॉझिटिव्ह, 3 तालुक्यांत स्फोट!! संतनगरीत गंभीर वाढ; चौघांचा मृत्यू

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः फेब्रुवारी मध्यावर धोकादायक कमबॅक करणाऱ्या कोरोनाचे संमिश्र तांडव आज देखील कायम राहिले! 368 पॉझिटिव्ह व चौघांचा मृत्यू झाला असतानाच 3 तालुक्यात कोरोनाचा अक्षरशः स्फोट झाल्यासारखे चित्र असून संतनगरीत रुग्ण संख्येत गंभीर वाढ झाल्याचे दिसून येते, या परिस्थितीत 5 तालुक्यातील घट हाच काय तो दिलासा ठरला आहे. स्वॅब संकलनाची गती वाढविण्यात …
 

बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी) ः फेब्रुवारी मध्यावर धोकादायक कमबॅक करणाऱ्या कोरोनाचे संमिश्र तांडव आज देखील कायम राहिले! 368 पॉझिटिव्ह व चौघांचा मृत्यू झाला असतानाच 3 तालुक्यात कोरोनाचा अक्षरशः स्फोट झाल्यासारखे चित्र असून संतनगरीत रुग्ण संख्येत गंभीर वाढ झाल्याचे दिसून येते, या परिस्थितीत 5 तालुक्यातील घट हाच काय तो दिलासा ठरला आहे.

स्‍वॅब संकलनाची गती वाढविण्यात आल्याने 2588 नमुने गोळा करण्यात आले. त्‍यापैकी प्राप्त 2149 स्‍वॅबचे अहवाल प्राप्‍त झाले असून, त्‍यातील 368 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात चिखलीतील 90 , बुलडाणा 74, खामगाव 61 असे बाधित आढळल्याने तालुक्यात कोरोना स्फोट झाल्यासारखी स्थिती आहे. यापाठोपाठ शेगावमध्ये 44 रुग्ण आढळणे धोक्याची घंटी मानली जात आहे. मेहकर 22, नांदुरा 26, देऊळगाव राजामध्ये 21 रुग्‍ण आढळल्‍याने कोरोना डोके वर काढत असल्याचे चित्र आहे. 23 फेब्रुवारीला राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या जळगाव जामोदमधील रुग्णसंख्या 19 वर आहे. या तुलनेत लोणार 1, मोताळा 4, संग्रामपूर 0 सिंदखेडराजा 4 या तालुक्यांतील संख्या आटोक्यात आहे. कोरोनाने चौघांचे बळी घेतल्‍याचे सकाळी समोर आले आहे.