कोरोनाचे धक्कादायक तांडव! मार्चमध्ये रेकॉर्डब्रेक 76 बळी!! गत् वर्षात 154, यंदा साडेतीन महिन्यांतच 162 मृत्यू

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनविरुद्धच्या आरपारच्या व अमर्यादित लढाईमध्ये मागील मार्च महिना सर्वात भीषण व जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांची कठोर सत्व परीक्षा घेणारा ठरलाय!मार्च 2021 मध्ये बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाने रेकॉर्डब्रेक 76 बळी घेतले आहेत. यावर कळस म्हणजे गत वर्षभरात मिळून 154 मृत्यू झाले असताना चालू वर्षातील साडेतीन महिन्यांतच कोविडने 162 बळी …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनविरुद्धच्या आरपारच्या व अमर्यादित लढाईमध्ये मागील मार्च महिना सर्वात भीषण व जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणांची कठोर सत्व परीक्षा घेणारा ठरलाय!मार्च 2021 मध्ये बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाने रेकॉर्डब्रेक 76 बळी घेतले आहेत. यावर कळस म्हणजे गत वर्षभरात मिळून 154 मृत्यू झाले असताना चालू वर्षातील साडेतीन महिन्यांतच कोविडने 162 बळी घेतल्याचे धक्कादायक वृत्त आहे.
कोरोनाची दुसरी लाट पहिलीपेक्षा कितीतरी भयंकर आहे. कोरोना बधितांची टक्केवारी, दैनंदिन रुग्ण संख्या, मृत्यूचे प्रमाण, वेगाने होणारा फैलाव, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत कोविडने मारलेली मुसंडी सर्वच भीतीदायक व धक्कादायक आहे. गत्‌ वर्षी मार्च 2020 मध्ये जिल्ह्यात पहिल्या बळीची नोंद झाली. मे 2020 मध्ये 2, जूनमध्ये 9 तर जुलै व ऑगस्टमध्ये प्रत्येकी 18 मृत्यूंची नोंद झाली. मात्र गत वर्षातील सप्टेंबर महिना कोरोनाचा अनर्थ सांगणारा ठरला. त्या महिन्यात तब्बल 46 जण मृत्यूमुखी पडले. ऑक्टोबरमध्ये 33 जण दगावले. यानंतर कोरोनाचा (पहिल्या लाटेचा) भर ओसरला. नोव्हेंबर 20 मध्ये 9 तर डिसेंबर मध्ये 18 बळी गेले. त्यानंतर नवीन वर्षात पहिल्या 2 महिन्यांत कोविड काहीसा शांत राहिला. मात्र जानेवारीमध्ये 16 तर फेब्रुवारीमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला. मात्र मार्च 2021 मध्ये कोरोनाने पुन्हा जोरदार दमदार कमबॅक करीत जिल्ह्यात मुसंडी मारली. हा हल्ला इतका घातक होता की एका महिन्यातच तब्बल 76 जणांचे बळी गेले आहेत. म्हणजे दिवसाकाठी किमान 2 बळी गेलेत. एप्रिल मध्यावरच मृत्यूचा आकडा 45 पर्यंत गेला आहे. यामुळे हा महिनादेखील मार्च महिन्याशी स्पर्धा करणारा ठरला आहे.