कोरोनाचे नवे १० रुग्‍ण समोर; २८ जणांना डिस्‍चार्ज, २२ रुग्‍णांवर उपचार सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 जुलैला कोरोनाचे नवे 10 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 28 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. सध्या 22 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3021 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3011 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 10 …
 
कोरोनाचे नवे १० रुग्‍ण समोर; २८ जणांना डिस्‍चार्ज, २२ रुग्‍णांवर उपचार सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 17 जुलैला कोरोनाचे नवे 10 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 28 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली. सध्या 22 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3021 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3011 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 10 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 820 तर रॅपिड टेस्टमधील 2191 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 3011 अहवाल निगेटिव्ह आहेत.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली शहर : 1, चिखली तालुका : शिंदी हराळी 1, खामगाव शहर : 3, शेगाव तालुका : कालखेड 1, मेहकर शहर :3, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 10 रूग्ण आढळले आहे.

एकूण बाधितांचा आकडा 87200 वर
आज 28 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 614911 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86512 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2247 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87200 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 22 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 666 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.