कोरोनाचे नवे ११ पॉझिटिव्‍ह रुग्‍ण!; बाधितांचा आकडा पुन्‍हा अर्धशतकपार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 6 ऑगस्टला नवे 11 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, उपचार घेत असलेल्या बाधितांचा आकडा अर्धशतकपार गेला आहे. सध्या 56 रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 4 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2517 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2506 अहवाल …
 
कोरोनाचे नवे ११ पॉझिटिव्‍ह रुग्‍ण!; बाधितांचा आकडा पुन्‍हा अर्धशतकपार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 6 ऑगस्‍टला नवे 11 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, उपचार घेत असलेल्या बाधितांचा आकडा अर्धशतकपार गेला आहे. सध्या 56 रुग्‍ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 4 रुग्‍णांना डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2517 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2506 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 11 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 10 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 443 तर रॅपिड टेस्टमधील 2063 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली शहर : 3, चिखली तालुका : आमखेड 4, खंडाळा मकरध्वज 1, मनुबाई 1, देऊळगाव राजा तालुका : टाकरखेड भागीले 1, खामगाव तालुका : ज्ञानगंगापूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 11 रुग्ण आढळले आहेत.

एकूण बाधितांचा आकडा 87309 वर
आजपर्यंत 650114 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86581 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1888 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87309 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 56 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.