कोरोनाचे नवे १२ रुग्‍ण आढळले!; २२ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 8 सप्टेंबरला नवे 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 22 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्णालयांत 62 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 971 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 959 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 12 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. …
 
कोरोनाचे नवे १२ रुग्‍ण आढळले!; २२ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 8 सप्‍टेंबरला नवे 12 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले असून, 22 रुग्‍णांना डिस्‍चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्‍णालयांत 62 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 971 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 959 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 12 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 155 तर रॅपिड टेस्टमधील 804 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : तेल्हारा 1, बुलडाणा शहर : 1, देऊळगाव राजा शहर : 2, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर 5, नांदुरा तालुका : वडोदा 3 अशाप्रकारे जिल्ह्यात 12 रुग्ण आढळले आहे. वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे उपचारानंतर 22 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

62 रुग्‍ण घेताहेत उपचार
आजपर्यंत 700013 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86764 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1159 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87499 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 62 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 673 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.