कोरोनाचे नवे १६ रुग्‍ण समोर!; १९ रुग्‍ण झाले बरे

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 14 जुलैला कोरोनाचे नवे 16 रुग्ण समोर आले आहेत, तर 19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या रुग्णालयांत 37 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2729 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2713 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 16 …
 
कोरोनाचे नवे १६ रुग्‍ण समोर!; १९ रुग्‍ण झाले बरे

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 14 जुलैला कोरोनाचे नवे 16 रुग्‍ण समोर आले आहेत, तर 19 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या रुग्‍णालयांत 37 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2729 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2713 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 16 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 8 व रॅपीड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 606 तर रॅपिड टेस्टमधील 2107 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
लोणार तालुका : टिटवी 2, बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : हतेडी 1, शेगाव शहर : 3, शेगाव तालुका : लासुरा 1, खामगाव शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : नागणगाव 2, सरंबा 1, मेहकर शहर : 1, चिखली तालुका : मनुबाई 2, धंदरवाडी 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 16 रुग्ण आढळले आहेत.

19 रुग्‍णांना डिस्‍चार्ज
आज 19 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 607578 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86452 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1622 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87155 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 37 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 666 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.