कोरोनाचे नवे २१ रुग्‍ण; २ रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 1 सप्टेंबरला कोरानाचे नवे 21 रुग्ण आढळले असून, दिवसभरात 2 रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयांत 67 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1291 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1270 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 …
 
कोरोनाचे नवे २१ रुग्‍ण; २ रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 1 सप्‍टेंबरला कोरानाचे नवे 21 रुग्‍ण आढळले असून, दिवसभरात 2 रुग्‍णांना बरे झाल्याने रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्‍णालयांत 67 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1291 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1270 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 19 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 284 तर रॅपिड टेस्टमधील 986 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा तालुका : पांगरी 1, देऊळगाव मही 1, चिंचखेड 1, नागणगाव 1, बुलडाणा शहर : 13, लोणार तालुका : कोयाळी दहातोंडे 4 अशाप्रकारे जिल्ह्यात 21 रुग्ण आढळले आहे.

एकूण बाधितांचा आकडा 87439 वर
आजपर्यंत 692224 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86699 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1350 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87439 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.