कोरोनाचे नवे ५ रुग्‍ण आढळले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 31 ऑगस्टला कोरोनाचे नवे 5 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. दिवसभरात 1 रुग्ण बरा झाल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. सध्या रुग्णालयांत 48 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1531 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1526 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, …
 
कोरोनाचे नवे ५ रुग्‍ण आढळले!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 31 ऑगस्‍टला कोरोनाचे नवे 5 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत. दिवसभरात 1 रुग्‍ण बरा झाल्याने त्‍याला डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या रुग्‍णालयांत 48 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1531 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1526 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 5 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 2 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 220 तर रॅपिड टेस्टमधील 1306 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा शहर : 3, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 1, चिखली शहर : 1.

एकूण बाधितांचा आकडा 87418 वर
आजपर्यंत 690954 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86697 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1350 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87418 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.