कोरोनाचे नवे ७ रुग्‍ण; ६ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 2 ऑगस्टला कोरोनाचे नवे 7 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, 6 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1017 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1010 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त …
 
कोरोनाचे नवे ७ रुग्‍ण; ६ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 2 ऑगस्‍टला कोरोनाचे नवे 7 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, 6 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1017 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1010 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपिड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 600 तर रॅपिड टेस्टमधील 410 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : दहीगाव 1, चिखली शहर : 2, देऊळगाव राजा तालुका : गडलिंग 1, भिवगण 1, खामगाव शहर : 1, जळगाव जामोद तालुका : हिंगणा 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रुग्ण आढळले आहेत. आज 6 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

32 रुग्‍णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 642242 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86570 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1367 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87274 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 32 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.