कोरोनाचे नवे ९ रुग्‍ण!, १० जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 सप्टेंबरला कोरोनाचे नवे 9 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. दिवसभरात 10 रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या रुग्णालयांत 73 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1639 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1630 अहवाल कोरोना …
 
कोरोनाचे नवे ९ रुग्‍ण!, १० जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 सप्‍टेंबरला कोरोनाचे नवे 9 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत. दिवसभरात 10 रुग्‍ण बरे झाले आहेत. त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या रुग्‍णालयांत 73 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1639 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1630 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 9 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 7 व रॅपिड अँटिजेन चाचणीमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 417 तर रॅपिड टेस्टमधील 1213 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
देऊळगाव राजा तालुका : सातेफळ 1, चिखली तालुका : कोनड खुर्द 1, हिवरखेड 1, संग्रामपूर तालुका : लाडणापूर 1, बुलडाणा शहर : 3, शेगाव तालुका : येऊलखेड 1, परजिल्हा लोहारा ता. बाळापूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 9 रुग्ण आढळले आहेत.

73 रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 695539 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86710 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 86710 आहे. आज रोजी 1050 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87456 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सद्यःस्थितीत कोविडचे 73 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 673 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.