कोरोनाचे २२ रुग्‍ण घेताहेत उपचार!; नव्या ६ जणांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 27 जुलैला कोरोनाचे नवे 6 रुग्ण समोर आले आहेत. सध्या रुग्णालयांत एकूण 22 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1400 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1394 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये …
 
कोरोनाचे २२ रुग्‍ण घेताहेत उपचार!; नव्या ६ जणांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 27 जुलैला कोरोनाचे नवे 6 रुग्‍ण समोर आले आहेत. सध्या रुग्‍णालयांत एकूण 22 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1400 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1394 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 3 व रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 302 तर रॅपिड टेस्टमधील 1092 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
संग्रामपूर तालुका : पातुर्डा 1, वकाणा 1, संग्रामपूर शहर : 1, चिखली तालुका : डोढरा 1, अंत्री खेडेकर 1, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 6 रुग्ण आढळले आहेत.

22 रुग्‍णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 631258 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86552 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1556 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87246 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 22 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.