कोरोनाचे २ बळी!; नवे ७ पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 20 जुलैला कोरोनाचे नवे 7 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, दिवसभरात 5 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. उपचारादरम्यान अंबोडा (ता. नांदुरा) येथील 67 वर्षीय महिला व जळगाव जामोद येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन …
 
कोरोनाचे २ बळी!; नवे ७ पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 20 जुलैला कोरोनाचे नवे 7 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले असून, दिवसभरात 5 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. उपचारादरम्यान अंबोडा (ता. नांदुरा) येथील 67 वर्षीय महिला व जळगाव जामोद येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1592 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1585 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 7 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 539 तर रॅपिड टेस्टमधील 1046 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 1, बुलडाणा तालुका : हतेडी बुद्रूक 1, चौथा 1, जळगाव जामोद शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : नागणगाव 1, नांदुरा तालुका : पातोंडा 1, मेहकर शहर : 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 7 रुग्ण आढळले आहेत. आज 5 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

19 रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 620651 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86528 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1329 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87216 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 19 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आजपर्यंत 669 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.