कोरोनाच्या ‘कमबॅक’मुळे प्रशासन हाय अलर्ट! उद्या ‘चिंतन बैठक’!!

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रशासन व जनतेच्या भरभक्कम एकीमुळे डिसेंबर अखेरीस बुलडाणा शहरासह जिल्ह्याचा निरोप घेण्याच्या मूडमध्ये असलेला कोरोना आता 2021 मध्ये पुन्हा परत येण्याच्या धोकादायक मूडमध्ये दिसतोय! अर्थात त्याला पब्लिकनेच परत बोलावले वा कमबॅकसाठी एकप्रकारे मदतच केल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पुन्हा हाय अलर्ट झाले …
 

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः प्रशासन व जनतेच्या भरभक्कम एकीमुळे डिसेंबर अखेरीस बुलडाणा शहरासह जिल्ह्याचा निरोप घेण्याच्या मूडमध्ये असलेला कोरोना आता 2021 मध्ये पुन्हा परत येण्याच्या धोकादायक मूडमध्ये दिसतोय! अर्थात त्याला पब्लिकनेच परत बोलावले वा कमबॅकसाठी एकप्रकारे मदतच केल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा पुन्हा हाय अलर्ट झाले असून, उद्या, 16 फेब्रुवारीला या संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणांनी घेतलेल्या कठोर मेहनतीला सर्वसामान्य जनतेने मार्च ते नोव्हेंबर 2019 या लॉकडाउन काळात मदत केली. मास्क, सॅनिटायझर व अंतराचे पालन केले. पोलीस व पालिकांच्या पथकांनी जरब बसविली. खास म्हणजे पब्लिकने सर्वतोपरी सहकार्य करीत नियम, निर्देशांचे पालन केले. मात्र दिवाळीच्या आसपास सर्व क्षेत्र अनलॉक झालेत अन्‌ कोरोना परत थबकला! लग्न आदी समारंभ, त्यासह बाजारपेठेमधील मोकाट गर्दी, निवडणुका, लोकांनी शिस्त व नियमांना दिलेली सोडचिठ्ठी यामुळे कोविड परत फिरलाय! जानेवारी मध्यापर्यंत दैनिक रुग्णांचा आकडा दुहेरी तोही 30-40 च्या आसपास राहिला, नंतर त्यात वाढ होत गेली. चालू महिन्यात त्यात आणखी वाढ होऊन फेब्रुवारी मध्यावर हा आकडा धोकादायक वळणावर पोहोचला! 15 फेब्रुवारीपर्यंत एकूण 912 रुग्णाची नोंद झाली. व्हॅलेंटाईन डे ला 110 तर 15 फेब्रुवारीला 129 चा आकडा समोर आलाय. यामुळे या कमबॅकवर बारकाईने लक्ष देऊन असलेले जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते, सीएस डॉ. नितीन तडस, डीएचओ डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी संवाद साधून अंती तातडीच्या बैठकीचा निर्णय घेतला. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची बैठक पार पडणार आहे. या निर्णायक बैठकीत काय निर्णय घेतला जातो, काही कठोर निर्णय घेतले जातात काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.