कोरोनाच्‍या ३ नव्या रुग्‍णांची भर; १५ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 सप्टेंबरला कोराेनाचे 3 नवे रुग्ण समोर आले असून, हे रुग्ण बुलडाणा शहरातील चिंचोले चौक भागातील आहेत. दरम्यान, दिवसभरात 15 रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 72 रुग्ण उपचार घेत आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 822 अहवाल प्राप्त झाले …
 
कोरोनाच्‍या ३ नव्या रुग्‍णांची भर; १५ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 7 सप्‍टेंबरला कोराेनाचे 3 नवे रुग्‍ण समोर आले असून, हे रुग्‍ण बुलडाणा शहरातील चिंचोले चौक भागातील आहेत. दरम्‍यान, दिवसभरात 15 रुग्‍णांना बरे झाल्याने रुग्‍णालयांतून डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या 72 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 822 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 819 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 116 तर रॅपिड टेस्टमधील 703 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 699054 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86742 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 950 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87487 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 72 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 673 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.