कोरोनाने उभारली ‘916 फूट गुढी’! गुढीपाडव्यावरही कोविडचे सावट!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः 13 चा आकडा अशुभ समजला जातो, यावर मतभेद असू शकतात; पण कोरोनाने यंदाच्या गुढीपाडव्याचे तीन तेरा केलेत हे नक्की! जिल्हावासीयांना कोणताही आनंद, दिलासा मिळूच द्यायचा नाय असा चंग बांधलेल्या कोरोनाने आज तब्बल 916 फुटी गुढी उभारलीय! सोमवारपेक्षा आज मंगळवारी तब्बल 3 पट जास्त ( 916) कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आज प्रशासनच नव्हे …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः 13 चा आकडा अशुभ समजला जातो, यावर मतभेद असू शकतात; पण कोरोनाने यंदाच्या गुढीपाडव्याचे तीन तेरा केलेत हे नक्की! जिल्हावासीयांना कोणताही आनंद, दिलासा मिळूच द्यायचा नाय असा चंग बांधलेल्या कोरोनाने आज तब्बल 916 फुटी गुढी उभारलीय! सोमवारपेक्षा आज मंगळवारी तब्बल 3 पट जास्त ( 916) कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने आज प्रशासनच नव्हे सर्वसामान्य जिल्हावासीही हादरले!

आठवड्याच्या प्रारंभी म्हणजे 12 एप्रिलला अवघे 341 पॉझिटिव्ह निघाल्याने जिल्हावासीयांसह आरोग्य यंत्रणा सुखावल्याचे चित्र होते. मात्र 12 तारखेला मिळालेल्या या मोठ्या दिलास्यावर 24 तासांतच विरजण पडले! साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मंगल दिनी चारपाचशे नव्हे तब्बल 916 पॉझिटिव्ह निघाले. यामुळे आज सकाळपासून सर्वत्र असलेला उत्साह मावळला. काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या कोविडने हजाराच्या दिशेने कूच केल्यावर आणखी काय होणार?

4964 जणांचे तोंड गोड?

जादा नमुने संकलन, जास्त चाचण्या म्हणजे जास्त रुग्ण हा समज वा तर्क बलाढ्य कोरोना राक्षसाने पुन्हा बरोबर ठरविला. गत 24 तासांत 7142 स्वॅब नमुने संकलित करण्यात आले. यामध्ये रॅपिडचा 5057चा मोठा वाटा होता. यातील 5907 अहवाल प्राप्त झालेत. यातील 916 पॉझिटिव्ह आले! याउलट सुदैवी ठरलेल्या 4964 जणांचा गुढीपाडवा साजरा करायचा व तोंड गोड करण्याचा मार्ग मोकळा झाला. पॉझिटिव्हमध्ये  रॅपिडचा 661 इतका मोठा वाटा आहे. सामान्यासाठी हे सर्व  शाब्दिक व तांत्रिक बुडबुडे आहेत. त्यामुळे  916 फुटाच्या गुढीने ते हादरने स्वाभाविकच ठरते.