कोरोनाने चिखलीत दोन बळी घेतले!; दिवसभरात 23 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 6 जानेवारीला कोरोनाने दोन बळी घेतले असून, उपचारादरम्यान चिखली येथील 70 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 23 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 251 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 228 अहवाल कोरोना …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात 6 जानेवारीला कोरोनाने दोन बळी घेतले असून, उपचारादरम्यान चिखली येथील 70 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 23 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 251 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 228 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 23 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 22 व रॅपीड अँटीजेन टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 162 तर रॅपिड टेस्टमधील 66 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

सिंदखेड राजा शहर : 1, खामगाव तालुका : पळशी 1, खामगाव शहर : 2, चिखली शहर : 1,  मोताळा तालुका : दाभाडी 1,  मोताळा शहर : 2, बुलडाणा शहर : 2, नांदुरा शहर :1, नांदुरा तालुका : अवधा बुद्रूक 1, शेगाव शहर : 9, शेगाव तालुका : जवळा 1, भोनगाव 1

29 रुग्णांनी केली कोरोनावर मात

29 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः  बुलडाणा : अपंग विद्यालय 12, देऊळगाव राजा : 3, चिखली : 4, खामगाव : 9,  मोताळा : 1.

358 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 92283 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12289 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 771 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12802 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 358 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 155 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.