कोरोनाने दोन पुरुषांचा बळी!; 43 नवे पॉझिटिव्‍ह, 41 रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने दोन पुरुषांचा बळी घेतला असून, उपचारादरम्यान बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात वर्दडी (ता. सिंदखेड राजा) येथील 38 वर्षीय पुरुष व पिंप्री खंडारे (ता. लोणार) येथील 32 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज, 25 जूनला मृत्यू झाला आहे. दिवसभरात 43 नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत, तर 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज …
 
कोरोनाने दोन पुरुषांचा बळी!; 43 नवे पॉझिटिव्‍ह, 41 रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने दोन पुरुषांचा बळी घेतला असून, उपचारादरम्यान बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात वर्दडी (ता. सिंदखेड राजा) येथील 38 वर्षीय पुरुष व पिंप्री खंडारे (ता. लोणार) येथील 32 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज, 25 जूनला मृत्यू झाला आहे. दिवसभरात 43 नवे पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत, तर 41 रुग्‍ण बरे झाल्‍याने त्‍यांना डिस्‍चार्ज मिळाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2997 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2954 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 43 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 29 व रॅपीड टेस्टमधील 4 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 722 तर रॅपिड टेस्टमधील 2232 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : दत्तापूर 1, चिखली तालुका : शेलसूर 1, इसरूळ 1, गांगलगाव 2, नायगाव 1, बेराळा 2, नांदुरा तालुका : इसापूर 2, मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : उमाळी 1, दसरखेड 1, मोताळा तालुका : शेलापूर 1, शेगाव शहर : 1, शेगाव तालुका : मनारखेड 1, जानोरी 1, भोनगाव 1, संग्रामपूर तालुका : अकोली खुर्द 3, कवठळ 1, खामगाव तालुका : तांदुळवाडी 1, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : सरंबा 1, जांभोरा 1, पांगरी 1, माळेगाव 1, भिवगण 1, सिंदखेड राजा तालुका : वाकड 1, किनगाव राजा 2, जळगाव जामोद शहर : 2, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 1, मेहकर तालुका : मोहतखेड 1, लोणार शहर : 1, परजिल्हा सावंगी (ता. भोकरदन) 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 43 रुग्ण आढळले आहेत.

110 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 41 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 561086 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85716 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1090 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86484 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयात 110 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 658 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.