कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच…आजही आढळले 129 बाधित!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसून, काल शतक पार केल्यानंतर आज, 15 फेब्रुवारीला सव्वाशतकही कोरोनाबाधितांच्या आकड्याने पार केले. दिवसभरात 129 पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. 30 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 434 अहवाल प्राप्त झाले …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या पुन्‍हा एकदा वाढताना दिसून, काल शतक पार केल्यानंतर आज, 15 फेब्रुवारीला सव्वाशतकही कोरोनाबाधितांच्‍या आकड्याने पार केले. दिवसभरात 129 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आले आहेत. 30 रुग्‍ण बरे झाल्‍याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 434 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 305 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 129 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 114 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 15 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 199 तर रॅपिड टेस्टमधील 106 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 24, बुलडाणा तालुका : अजिसपूर 1, देऊळगाव राजा तालुका : आळंद 2, मेहुणा राजा 1, पिंपळनेर 2, देऊळगाव राजा शहर : 5, खामगाव शहर : 12, शेगाव शहर : 12, शेगाव तालुका : गायगाव बुद्रूक 3, जानोरी 2, चिखली शहर : 23, चिखली तालुका : सोमठाणा 1, भरोसा 1, सवणा 4, देऊळगाव घुबे 1, कवठळ 1, शिरपूर 1, जांभोरा 1, शेलगाव 1, गोरेगाव 1, जळगाव जामोद तालुका : वाडी खुर्द 3, लोणार शहर : 6, मोताळा तालुका : टाकळी 1, सिंदखेड राजा तालुका : बारलिंगा 1, मलकापूर तालुका : माकनेर 2, मलकापूर शहर : 9, नांदुरा तालुका : डिघी 1, संग्रामपूर तालुका : सावळी 3, मूळ पत्ता तेल्हारा जि. अकोला 1, जाळीचा देव ता. भोकरदन जि. जालना 1, महागाव जि. यवतमाळ 1, डोंगरगांव ता. बाळापूर जि अकोला 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 129 रूग्ण आढळले आहे.

30 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

अज 30 रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्‍ण असे ः खामगाव : 5, चिखली : 6, देऊळगाव राजा : 7, बुलडाणा : अपंग विद्यालय 7, मोताळा : 1, शेगाव : 4.

622 कोरोना बाधित रुग्‍णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 115603 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 14145 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 780 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14944 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालायात 622 कोरोना बाधित रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 177 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.