कोरोनाबाधितांचा आकडा १३ हजार पार; आज आढळले ५६ पॉझिटिव्ह

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात आज, ११ जानेवारीला ५६ नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले असून, ५० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६१९ अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी ५६३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात आज, ११ जानेवारीला ५६ नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले असून, ५० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ६१९ अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी ५६३ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५६ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील ५३ व रॅपिड टेस्टमधील ३ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 464 तर रॅपिड टेस्टमधील 99 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : ९, बुलडाणा तालुका : पोखरी १, खामगाव शहर : ११, देऊळगाव राजा शहर : 2, मोताळा शहर: १, चिखली शहर : २, शेगाव तालुका : जानोरी १, करंजा १, आळसणा २, शेगाव शहर : ७, चिखली तालुका : शिंदी हराळी २, अंचरवाडी १, दिवठाणा १, सवडद १, रताळी १, नांदुरा तालुका : शेंबा १, खामगाव तालुका: घाटपुरी 1, मांडका 1, मलकापूर शहर : ४, लोणार शहर : ४, जळगाव जामोद शहर : १, मूळ पत्ता निंबा ता. बाळापूर जि. अकोला १ अशाप्रकारे जिल्ह्यात ५६ रुग्ण आढळले आहेत.
५० रुग्णांची कोरोनावर मात
आज ५० रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटर नुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे : बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय ३, शेगाव : ७, चिखली : १५, खामगाव : १५, मोताळा : १, सिंदखेड राजा : ५, मलकापूर: ४.
३२१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत ९४४५२ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२५३६ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच ३९७ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३०१४ कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३२१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.