कोरोनाबाधितांचा आकडा 14 हजार पार! आज 39 नव्यांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आज, 1 फेबु्रवारीला 14 हजार पार गेला आहे. दिवसभरात 39 नव्या बाधितांची भर पडली असून, एकूण बाधितांचा आकडा 14012 झाला आहे. 65 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 584 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 545 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आज, 1 फेबु्रवारीला 14 हजार पार गेला आहे. दिवसभरात 39 नव्या बाधितांची भर पडली असून, एकूण बाधितांचा आकडा 14012 झाला आहे. 65 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 584 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 545 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 39 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 37 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 2 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 484 तर रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 3, देऊळगाव राजा शहर : 5, चिखली शहर : 1, चिखली तालुका : दिवठाणा 1, रायपूर 1, वळती 1, बुलडाणा तालुका : नळकुंड 1, निमखेडी 1, शेगाव शहर : 6, मोताळा तालुका : तळणी 2, वडगाव 1, पोफळी 1, लोणार तालुका : पांगारा डोळे 1, लोणार शहर : 1, मेहकर शहर : 2, मोताळा शहर: 1, देऊळगाव राजा तालुका : सावखेड भोई 1, सातेफळ 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 3, मलकापूर पांग्रा 1, शेगाव तालुका : येऊलखेड 1, गव्हाण 1, जानोरी 1, मूळ पत्ता खाजीखेड ता. बाळापूर जि. अकोला येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 39 रुग्ण आढळले आहेत.
65 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 65 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 4, लोणार : 6, चिखली : 5, सिंदखेड राजा : 1, खामगाव : 4, जळगाव जामोद : 5, मलकापूर : 2, मोताळा : 3, मेहकर : 18, संग्रामपूर :1, शेगाव : 9, देऊळगाव राजा : 6, नांदुरा : 1.
360 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 109825 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13483 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच 846 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14012 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 360 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 169 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.