कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्‍या टप्‍प्‍यात; रुग्‍णालयांत उपचार घेताहेत 2492 बाधित!; आज 446 नव्‍यांची भर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या टप्प्यांवर पोहोचला आहे. आजअखेर एकूण बाधितांचा आकडा 19980 आहे. आज, 4 मार्चला 446 नव्यांची भर पडल्याने रुग्णालयांत सध्या 2492 बाधित उपचार घेत आहेत. दिवसभरात 581 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांच्या टप्‍प्‍यांवर पोहोचला आहे. आजअखेर एकूण बाधितांचा आकडा 19980 आहे. आज, 4 मार्चला 446 नव्‍यांची भर पडल्‍याने रुग्‍णालयांत सध्या 2492 बाधित उपचार घेत आहेत. दिवसभरात 581 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2695 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2249 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 446 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 360 व रॅपीड टेस्टमधील 86 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1610 तर रॅपिड टेस्टमधील 639 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

शेगाव शहर : 34, शेगाव तालुका : टाकळी विरो 7, खेर्डा 1, सगोडा 1, जलंब 1, पहुरजिरा 3, खामगाव शहर : 34, खामगाव तालुका : पिंपळगाव राजा 2, लोणी गुरव 1, लाखनवाडा 1, पळशी 7, सुटाळा बुद्रूक 7, किन्ही महादेव 15, गारडगाव 4, अटाळी 2, संग्रामपूर तालुका : पांचाळ बुद्रूक 1, पातुर्डा 1, पळशी झाशी 1, वरवट बकाल 6, सोनाळा 1, वानखेड 5, कोलद 1, बुलडाणा शहर : 34, बुलडाणा तालुका : रायपूर 1, धामणदरी 1, वरवंड 5, सुंदरखेड 4, दहीद 1, मोताळा शहर : 8, मोताळा तालुका : तरोडा 4, पिंपळगाव नाथ 7, पान्हेरा 3, बोराखेडी 1, चिखली शहर : 33, चिखली तालुका : किन्होळा 1, आमखेड 1, सावरगाव 2, येवता 1, करतवाडी 1, काळेगाव 1, टाकरखेड मुसलमान 1, उत्रादा 1, कोलारा 1, भोकर 3, शिंदी हराळी 1, मलकापूर शहर : 37, मलकापूर तालुका : दाताळा 1, आळंद 1, पिंपळखुटा 2, वाकोडी 2, नांदुरा शहर : 28, नांदुरा तालुका : निमगाव 2, शेंबा 3, कोळंबा 1, वडनेर 1, मामुलवाडी 1, टाकरखेड 7, शेलगाव मुकूंद 2, नायगाव 4, पोटळी 1, जळगाव जामोद शहर : 11, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 3, हिंगणा 1, मानेगाव 5, झाडेगाव 1, देऊळगाव राजा शहर : 23, देऊळगाव राजा तालुका : नागणगाव 2, देऊळगाव मही 1,नारायणखेड 1, आळंद 1, पोखरी 1, तुळजापूर 1, सिनगाव जहागीर 5, अंढेरा 3, दगडवाडी 1, उंबरखेड 1, मेहकर तालुका : हिवरा खुर्द 2, जानेफळ 5, सिंदखेड राजा शहर : 13, सिंदखेड राजा तालुका : अंचली 2, किनगाव राजा 2, उगला 1, शेलगाव राऊत 2, साखरखेर्डा 3, रताळी 2, लोणार शहर : 1, मूळ पत्ता पारशिवणी जि. नागपूर 2, येनगाव ता. बोदवड जि. जळगाव 1, औरंगाबाद 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 446 रूग्ण आढळले आहे.

581 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 581 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः जळगाव जामोद : 158, बुलडाणा : सिद्धीविनायक हॉस्पीटल 6, अपंग विद्यालय 107, स्त्री रूग्णालय 9, मुलींचे वसतिगृह 3, शेगाव : 40,चिखली : 56, खामगाव : 7, देऊळगाव राजा : 43, लोणार : 17, मेहकर : 23, नांदुरा : 45, सिंदखेड राजा : 12, मोताळा : 8, मलकापूर : 43.

आजवर 17293 रुग्‍ण बरे

आजपर्यंत 144246 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 17293 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 7910 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 19980 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 2492 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 195 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.