कोरोनाबाधितांचा आकडा 32 हजार पार!; 6 हजार रुग्‍ण हॉस्‍पिटलमध्ये घेताहेत उपचार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 24 मार्चला 855 नवे कोरोनाबाधित आढळले असून, 497 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दरम्यान, एकूण बाधितांचा आकडा 32 हजार पार गेला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 855 अहवाल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 24 मार्चला 855 नवे कोरोनाबाधित आढळले असून, 497 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली. दरम्‍यान, एकूण बाधितांचा आकडा 32 हजार पार गेला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4664 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 855 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 523 व रॅपीड टेस्टमधील 332 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 859 तर रॅपिड टेस्टमधील 2950 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 85, बुलडाणा तालुका : सागवन 2, मढ 1, येळगाव 2, रायपूर 5, सुंदरखेड 6, डोंगरखंडाळा 2, देऊळघाट 1, बिरसिंगपूर 2, रूईखेड 1, दत्तपूर 7, पाडळी 1, धाड 4, अजिसपूर 3, पांगरी 1, जांब 1, शिरपूर 2, अटकळ 1, कोलवड 3, चिखली शहर :79, चिखली तालुका : मेरा बु्द्रूक 1, साखळी 1, ढासाळा 4, बोरगाव 1, भोरसा भोरसी 1, भागापूर 1, अमडापूर 9, कोलारा 3, मालगणी 1, सावरगाव डुकरे 2, हिवरा नाईक 1, पेठ 1, कवठळ 2, उंद्री 2, मलगी 1, टाकरखेड हेलगा 4, अमोना 1, शेलूद 2, वरूड 1, चंदनपूर 3, गोद्री 1, खोर 2, मुंगसरी 1, वळती 1, भोगावती 1, इसोली 1, भालगाव 3, येवता 2, मंगरूळ 1, किन्ही सवडत 1, शेलगाव आटोळ 1, कारखेड 1, दिवठाणा 1, वैरागड 1, दे. घुबे 2, करवंड 1, अंचरवाडी 3, उत्रादा 1, बरटाळा 1, एकलारा 1, किन्होळा 2, खामगाव शहर : 87, खामगाव तालुका : गोंधनपूर 1, टेंभुर्णा 1, बोथा 1, गारडगाव 1, संभापूर 3, कुंड 3, चिंचपूर 1, निमकवळा 1, आवार 11, लाखनवाडा 4, गणेशपूर 1, पिंपळगाव राजा 6, हिवरा खुर्द 1, भालेगाव 4, राहुड 1, पळशी 1, संग्रामपूर शहर : 6, संग्रामपूर तालुका : पातुर्डा 11, सोनाळा 16, हिंगणा 2, निवाणा 3, पिंगळी 1, काटेल 1, वानखेड 7, टुनकी 3, वरवट 2, पिंप्री 5, चौंढी 1, पेसोडा 1, बावनबीर 1, वरवट खंडेराव 1, जळगाव जामोद शहर : 8, जळगाव जामोद तालुका : धानोरा 1, आसलगाव 1, भोंडेगाव 1, देऊळगाव राजा शहर : 6, देऊळगाव राजा तालुका : खल्याळ गव्हाण 3, डोईफोडेवाडी 3, सिनगाव जहाँगिर 2, तुळजापूर 1,निमखेड 2, मेहुणा राजा 1, शिवणी आरमाळ 1, ब्रह्मपुरी 1, सरंबा 1, दिग्रस 2, देऊळगाव मही 7, वाकी बुद्रूक 2, बायगाव 2, खैरव 1, पिंप्री आंधळे 1, सुरा 1, अंढेरा 1, नांदुरा शहर : 4, नांदुरा तालुका : हिंगणे गव्हाड 1, जवळा बाजार 1, मलकापूर शहर : 115, मलकापूर तालुका : भालेगाव 1, मोरखेड 1, घिर्णी 4, दुधलगाव 1, दाताळा 3, लासुरा 1, शिराढोण 3, उमाळी 12, नरवेल 2, हरसोडा 3, वाघुड 1, विवरा 2, लोणवडी 1, भाडगणी 1, दसरखेड 6, मेहकर शहर : 36, मेहकर तालुका : नागझरी 1, अंजनी बुद्रूक 1, हिवरा आश्रम 2, कळमेश्वर 3, वडगाव माळी 1, मोताळा शहर : 14, मोताळा तालुका : लोणघाट 2, महाळुंगी 15, आव्हा 1, कुऱ्हा 1, निपाणा 4, दाभाडी 1, कोथळी 2, चिंचपूर 1, महाल पिंप्री 1, धामणगाव बढे 1, बोराखेडी 1, खरबडी 2, वरूड 2, पिंपळगाव देवी 1, धामणगाव 1, सिंदखेड राजा शहर : 8, सिंदखेड राजा तालुका : शेंदुर्जन 1, साखरखेर्डा 4, रताळी 1, दुसरबीड 2, लोणार तालुका : बिबी 4, देऊळगाव 3, शिवणी 1, बोराखेडी 12, शारा 3, पांग्रा काटे 1, तांबोळा 1, टिटवी 4, सुलतानपूर 1, लोणार शहर : 3, शेगाव शहर : 15, शेगाव तालुका : चिंचोली 3, जानोरी 1, मूळ पत्ता जाळीचा देव 4, औरंगाबाद 1, धावडा ता. सिल्लोड 2, कळमेश्वर नागपूर 1, भोकरदन 1, आडगाव ता. पातूर 1, पोखरी ता. भोकरदन 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 855 रुग्ण आढळले आहेत.

6055 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार

विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरमधून 497 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 192835 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 26034 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 192835 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 32329 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 6055 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 240 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.