कोरोनाबाधितांचा नवा उच्‍चांक! 903 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण!!, खामगावने ओलांडले दीडशतक, बुलडाणा, मेहकर, नांदुरा शतकपार, 2 बळी!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : अखेर आरोग्य यंत्रणांसह जिल्हा प्रशासनाची भीती दुर्दैवाने खरी ठरले. बुलडाणा जिल्ह्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत आज 26 मार्चच्या काळ्या मुहूर्तावर 900 पेशंटचा आकडा ओलांडलाय! आज जिल्ह्यात तब्बल 903 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून आरोग्य यंत्रणा अक्षरशः हादरल्या !! गत् 24 तास जिल्ह्यासाठी भयावह ठरले. एकट्या खामगाव …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : अखेर आरोग्य यंत्रणांसह जिल्हा प्रशासनाची भीती दुर्दैवाने खरी ठरले. बुलडाणा जिल्ह्याने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत आज 26 मार्चच्या काळ्या मुहूर्तावर  900 पेशंटचा आकडा ओलांडलाय! आज जिल्ह्यात तब्बल 903 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून आरोग्य यंत्रणा अक्षरशः हादरल्या !!

गत्‌ 24 तास जिल्ह्यासाठी भयावह ठरले. एकट्या खामगाव तालुक्यातच दीडशेवर (153) पॉझिटिव्ह आढळले. बुलडाणा तालुका किंचित मागे असला तरी तालुक्याची आकडेवारी 146 अशी दणदणीत आहे. मेहकरने गाठलेली 103 रुग्णांची मजल कोरोनानाने या तालुक्यात पुन्हा कमबॅक केल्याचे मानण्यात येत आहे. मलकापूर (93 बाधित) व नांदुरा (104) या शेजारी तालुक्यांची स्थिती गंभीर असल्याचे चित्र पुन्हा सामोरे आले आहे. अशीच बाब सिंदखेडराजा (55 पॉझिटिव्ह) व देऊलगावराजा (68) या तालुक्यांतील आहे, देऊलगावराजा टॉप सिक्स मध्ये आहेच. मात्र मातृतीर्थ सिंदखेडराजामध्ये कुमार  कोविडने मारलेली मुसंडी धोकादायक ठरू पाहते. कोरोनाचा उद्रेक असलेल्या मराठवाड्याला लागून हे तालुके असून व्यापार उदीम आदी सर्वच बाबतीत त्या प्रांताशी कनेक्ट आहेत.

यांना कमी म्हणावे की…

दरम्यान वरील तालुक्यांत अवघ्या 24 तासांत धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाची  4 तालुक्यातील आकडेवारी तुलनेने कमी वाटते. टॉपर ग्रुपमधील चिखलीमध्ये 46, मोताळा तालुक्यात 34, लोणार तालुक्यात 32 कोरोना पेशंट निघाले. आता आकडे कमी नाहीत. पण ते इतरांच्या तुलनेतच! आता जळगाव जामोदमध्ये अवघे 6 रुग्ण आढळणे हा दिलासा मानायला आरोग्य यंत्रणाच काय लहान बालक सुद्धा तयार नाही. तसाही कोरोना उर्फ कोविड कोणताही दिलासा द्यायला तयार नाय. यापेक्षा शोलेमधला गब्बर परवडला! तो किमान ‘ गब्बर की टाप से तुम्‍हें एकही आदमी बचा शकता है, वो खुद गब्बर’ असा पर्याय देत होता. पण कोरोना काहीच द्यायला तयार नाही.