कोरोनामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या शंभरच्‍या आत!; नव्या 35 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर, एकही बळी नाही

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना झाल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या आता शंभरच्या आत आली असून, आज रोजी नव्या 35 रुग्णांसह 96 पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत. दिवसभरात एकही बळी कोरोनामुळे गेला नाही ही मोठी दिलासादायी गोष्ट आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2278 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी …
 
कोरोनामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या शंभरच्‍या आत!; नव्या 35 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर, एकही बळी नाही

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना झाल्‍याने उपचार घेणाऱ्यांची संख्या आता शंभरच्‍या आत आली असून, आज रोजी नव्‍या 35 रुग्‍णांसह 96 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत. दिवसभरात एकही बळी कोरोनामुळे गेला नाही ही मोठी दिलासादायी गोष्ट आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2278 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2243 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 35 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपिड टेस्टमधील 12 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 344 तर रॅपिड टेस्टमधील 1899 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 4, बुलडाणा तालुका : सावळा 1, येळगाव 1, चिखली शहर : 4, चिखली तालुका : पेनसावंगी 2, गांगलगाव 1, आमखेड 1, अंत्री खेडेकर 1, खामगाव शहर : 3, खामगाव तालुका : तांदुळवाडी 2, नांदुरा शहर : 1, नांदुरा तालुका : जिगाव 2, देऊळगाव राजा शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहाँगीर 1, भिवगण 1, आळंद 2, निवडुंगा 1, जळगाव जामोद तालुका : खोपडपट्टी 1, लोणार तालुका : महारचिकना 1, मेहकर तालुका : माऊतखेड 1, सिंदखेड राजा तालुका : नसिराबाद 1, शिवणी टाका 1, परजिल्हा रिसोड 1 अशा प्रकारे जिल्ह्यात 35 रुग्ण आढळले आहे.

48 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात
आज 48 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 542575 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85419 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1770 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 86168 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयांत 96 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 653 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.