कोरोनामुळे गर्भवतींना रक्‍ताच्‍या गुठळ्या होण्याचा धोका

मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे गर्भवती महिलांत रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याचा धोका आहे. फुफ्फुसं, किडनी आणि हृदय तसेच शरीराच्या इतर अवयवांवर कोरोनाचा परिणाम होतो. यातच आता रक्ताच्या गुठळ्या होणं ही समस्या देखील वाढली आहे. रक्तवाहिन्या खराब होतात तेव्हा रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्यास सुरुवात होते. यात शरीरामधील प्लेटलेट्सचे प्रमाणही कमी होते. कोरोनाचा गंभीर परिणाम शरीराच्या …
 

मुंबई (मुंबई लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनामुळे गर्भवती महिलांत रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याचा धोका आहे. फुफ्फुसं, किडनी आणि हृदय तसेच शरीराच्या इतर अवयवांवर कोरोनाचा परिणाम होतो. यातच आता रक्ताच्या गुठळ्या होणं ही समस्या देखील वाढली आहे.

रक्तवाहिन्या खराब होतात तेव्हा रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्यास सुरुवात होते. यात शरीरामधील प्लेटलेट्सचे प्रमाणही कमी होते. कोरोनाचा गंभीर परिणाम शरीराच्या विविध अवयवांवर होतो. गर्भवतींना रक्ताच्या गुठळ्या झाल्या तर पाय दुखण्याची समस्या अधिक उद्‌भवते.

काय कराल…
गर्भवतींनी स्वतःला ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे. यासाठी काही श्वासोच्छवासाचे प्रकार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यायाम योगासने करणं गरजेचं आहे. आहाराबद्दल विशेष काळजी घेतली पाहिजेत. या आजाराचा आपल्यावर आणि बाळावर परिणाम होऊ नये म्हणून गर्भवतींनी सर्वप्रथम तणावमुक्त राहावे. शक्यतो घराबाहेर जाणं टाळा. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या साध्या-सोप्या गोष्टींचे पालन करा.