कोरोनामुळे जिल्ह्यात आणखी एका पोलिसाचा मृत्‍यू; एएसआय भुतेकर यांची झुंज अयशस्वी!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अवघ्या जिल्हावासियांना कोरोनापासून वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या, त्यासाठी वेळप्रसंगी कठोर होणाऱ्या जिल्हा पोलीस दल आज, 24 एप्रिलला आपल्या लढवय्या साथीदाराला मुकले आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरिक्षक प्रतापराव भुतेकर (54) यांचे कोरोनाने औरंगाबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले. कोरोनामुळे मृत्यू झालेले ते जिल्ह्यातील दुसरे पोलीस कर्मचारी आहेत. यापूर्वी बुलडाणा शहर …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अवघ्या जिल्हावासियांना कोरोनापासून वाचविण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या, त्‍यासाठी वेळप्रसंगी कठोर होणाऱ्या जिल्हा पोलीस दल आज, 24 एप्रिलला आपल्या लढवय्या साथीदाराला मुकले आहे. साखरखेर्डा पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरिक्षक प्रतापराव भुतेकर (54) यांचे कोरोनाने औरंगाबाद येथे उपचारादरम्‍यान निधन झाले. कोरोनामुळे मृत्‍यू झालेले ते जिल्ह्यातील दुसरे पोलीस कर्मचारी आहेत. यापूर्वी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील पोहेकाँ गजानन तायडे यांचा बळी कोरोनाने घेतला होता.

प्रतापराव भुतेकर मूळचे सवणा (ता. चिखली) येथील रहिवासी होते. सुरुवातीला चिखली येथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर 15 दिवसांपासून त्यांना औरंगाबाद येथे भरती करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने आज सायंकाळी 4:20 मिनिटांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी अशी अपत्ये आहेत. हसतमुख आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अशी ख्याती मिळवलेले श्री. भुतेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने साखरखेर्डा पोलीस ठाण्यात शोककळा पसरली आहे.