कोरोनामुळे डोंगरखंडाळ्यातील वृद्धेचा मृत्‍यू; नव्‍या 118 बाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने 194 वा बळी घेतला असून, उपचारादरम्यान डोंगरखंडाळा (ता. बुलडाणा) येथील 77 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात 118 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, 288 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 555 अहवाल …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोनाने 194 वा बळी घेतला असून, उपचारादरम्यान डोंगरखंडाळा (ता. बुलडाणा) येथील 77 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात 118 नव्‍या पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली असून, 288 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 555 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 437 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 118 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 71 व रॅपीड टेस्टमधील 47 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 137 तर रॅपिड टेस्टमधील 300 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

मेहकर शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, चिखली शहर : 5, चिखली तालुका : शेलूद 1, मलकापूर शहर : 24, मलकापूर तालुका : वरखेड 1, जांभुळधाबा 1, शेगाव तालुका : जवळा 1, शेगाव शहर : 6, शेगाव तालुका : वरखेड 1, मनसगाव 1, खामगाव शहर : 17, खामगाव तालुका : सुटाळा बुद्रूक 1, घाटपुरी 1, बुलडाणा शहर : 21, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 2, रायपूर 1,वरवंड 1,मढ 1, डोंगरखंडाळा 1, म्हसला 1, मोताळा तालुका : गोतमारा 1, देऊळगाव राजा शहर : 4, देऊळगाव राजा तालुका : पोखरी 1, देऊळगाव मही 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : खंडाळा 2, जळगाव जामोद शहर : 2, जळगाव जामोद तालुका : खांडवी 2, सिंदखेड राजा शहर : 9, मूळ पत्ता अंदूरा ता. बाळापूर जि. अकोला 1, वडगाव वरूड जि. अमरावती 1, मुक्ताई नगर जि. जळगाव 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 118 रुग्ण आढळले आहेत.

288 रुग्‍णांची कोरोनावर मात

आज 288 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 45, बुलडाणा : अपंग विद्यालय 56, स्त्री रुग्णालय 12, कोविड समर्पित रुग्णालय 6, नांदुरा : 14, देऊळगाव राजा : 72, लोणार : 6, सिंदखेड राजा : 6, चिखली : 54, जळगाव जामोद : 8, मलकापूर : 9.

2528 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 137269 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 16064 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 9335 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 18786 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 2528 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 194 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.