कोरोनामुळे ढालसावंगीच्‍या महिलेचा मृत्‍यू; जिल्ह्यात नवे २२ पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 जुलैला 22 पॉझिटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली तर 20 रुग्णांना सुटी मिळाली. कोरोनामुळे उपचारादरम्यान बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात ढालसावंगी (ता. बुलडाणा) येथील 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2537 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2515 अहवाल …
 
कोरोनामुळे ढालसावंगीच्‍या महिलेचा मृत्‍यू; जिल्ह्यात नवे २२ पॉझिटिव्‍ह रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 जुलैला 22 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची नव्याने भर पडली तर 20 रुग्‍णांना सुटी मिळाली. कोरोनामुळे उपचारादरम्यान बुलडाण्यातील स्त्री रुग्णालयात ढालसावंगी (ता. बुलडाणा) येथील 70 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2537 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2515 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 22 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 15 व रॅपिड टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 620 तर रॅपिड टेस्टमधील 1895 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली शहर : 4, चिखली तालुका : भालगाव 1, बेराळा 3, सिंदखेड राजा शहर : 2, शेगाव तालुका : जानोरी 7, येऊलखेड 1, टाकळी 1, मेहकर शहर :1, देऊळगाव राजा शहर : 1, जळगाव जामोद शहर : 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 22 रुग्ण आढळले आहेत.

20 रुग्‍णांची कोरोनावर मात
आज 20 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत 599755 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86339 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1696 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87081 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 77 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 665 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.