कोरोनामुळे 2 महिलांचा मृत्‍यू; बाधितांचा आकडा 34 हजार पार; दिवसभरात नवे 903 रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 मार्चला कोरोनामुळे उपचारादरम्यान अमडापूर येथील 40 वर्षीय महिला, पिंपळखुटा ता. मलकापूर येथील 55 महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नवे 903 रुग्ण आढळल्याने एकूण बाधितांचा आकडा 34 हजार पार गेला असून, 644 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 मार्चला कोरोनामुळे उपचारादरम्यान अमडापूर येथील 40 वर्षीय महिला, पिंपळखुटा ता. मलकापूर येथील 55 महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नवे 903 रुग्‍ण आढळल्‍याने एकूण बाधितांचा आकडा 34 हजार पार गेला असून, 644 रुग्‍णांना डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 4516 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3613 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 903 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 589 व रॅपिड टेस्टमधील 314 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 520 तर रॅपिड टेस्टमधील 3093 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 75, बुलडाणा तालुका : बोरखेड 1, डोंगरखंडाळा 1, माळवंडी 1, सुंदरखेड 2, चांडोळ 4, धाड 2, डोमरूळ 1, नांद्राकोळी 1, अंबोडा 4, हतेडी बुद्रूक 1, जांब 12, दहीद 1, शिरपूर 3, पळसखेड भट 1, वरवंड 9, बिरसिंगपूर 1, मोताळा शहर : 2, मोताळा तालुका : सारोळा 3, काबरखेड 1,पोफळी 1, किन्होळा 1, पुन्हई 1, चिंचपूर 6, कोथळी 5, मूर्ती 1, तालखेड 5, पिंप्री गवळी 1, माकोडी 1, आव्हा 1, गुळभेली 1, केळापूर 1, तरोडा 2, धामणगाव बढे 2, पान्हेरा 1, पिंपळगाव देवी 1, सिंदखेड राजा शहर : 13, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 2, गुंज 7, सावखेड तेजन 2, दुसरबीड 1, पिंपळगाव उगले 1, किनगाव राजा 1, हिवरखेड 3, पळसखेड चक्का 1, पिंपळगाव लेंडी 1, वर्दडी 4, कंडारी 4, पिंपळखुटा 1, सोयदेव 1, दत्तापूर 1, धंदरवाडी 1, भोसा 1, राहेरी बु्द्रूक 3, सोनोशी 2, शेंदुर्जन 1, सवडत 1, बाळसमुद्र 4, भंडारी 1, सोनारा 1, हनवतखेड 1, चिखली शहर : 28, चिखली तालुका : करणखेड 1, पिंपळखेड 1, उंद्री 1, करवंड 1, केळवद 1, अंत्री तेली 1, कोळेगाव 1, भालगाव 1, टाकरखेड 2, पेनटाकळी 1, कोलारा 3, बोरगाव काकडे 1, कोनड 2, चांधई 1, रोहडा 1, शेलोडी 2, महीमळ 1, भानखेड 1, कवठळ 1, चंदनपूर 1, खामगाव शहर : 120, खामगाव तालुका : राहुड 1, कंझारा 1, खुटपुरी 2, रोहणा 1, हिंगणा उमरा 5, गारडगाव 3, लोखंडा 1, लाखनवाडा 1, जळका 1, ढोरपगाव 1, पिंपळगाव राजा 1, सज्जनपुरी 3, माक्ता 1, बोरी अडगाव 1, घारोड 1, कुंबेफळ 1, आडगाव 1, शेगाव शहर : 47, शेगाव तालुका : पहुरजिरा 2, मोरगाव 1, भोनगाव 1, चिंचोली 1, कनारखेड 1, जानोरी 2, जलंब 1, माटरगाव 1, लासुरा 1, नांदुरा शहर : 61, नांदुरा तालुका : तांदुळवाडी 1, टाकरखेड 4, वडनेर 14, नायगाव 1, सावरगाव 1, चांदुर बिस्वा 4, शिरसोडी 2, पिंप्री अढाव 2, पिंपळखुटा धांडे 4, निमगाव 4, शेलगाव मुकूंद 1, बुर्टी 1, माळेगाव गोंड 1, तिकोडी 1, लोणारखेड 2, अवधा 1, खैरा 5, मलकापूर शहर :49, मलकापूर तालुका : दसरखेड 17, भाडगणी 2, कुंड बुद्रूक 2, वरखेड 1, वाकोडी 1, घिर्णी 3, जांबुळधाबा 2, उमाळी 9, दाताळा 3, खामखेड 1, वजीराबाद 1, वडोदा 2, दुधलगाव 1, नरवेल 2, दे. राजा शहर : 32, दे. राजा तालुका : उमरद 4, उंबरखेड 1, सिनगांव जहा 6, खल्याळ गव्हाण 1, देऊळगाव मही 4, डोईफोडेवाडी 1, टेंभुर्णी 1, कुंभारी 1, असोला 1, अंढेरा 5, निवडुंगा 1, पिंप्री आंधळे 1, अकोलादेव 1, डोढ्रा 1, गारखेड 1, सावखेड भोई 2, पळसखेड देव 1, मेहकर शहर : 43, मेहकर तालुका : शेलगांव 1, वरूड 1, हिवरा आश्रम 4, बऱ्हाई 1, देऊळगाव माळी 6, जानेफळ 2, बोरी 4, बोथा 3, डोणगाव 3, जयताळा 1, कळमेश्वर 1, एकलासपूर 2, आंध्रुड 4, सावत्रा 2, उमरा देशमुख 2, भोसा 1, ब्रह्मपूरी 1, आरेगाव 1, उकळी 8, लोणार शहर : 7, लोणार तालुका : देऊळगाव 3, पिंप्री 9, मांडवा 2, बायखेड 1, शिवणी पिसा 1, बिबी 3, रायगाव 1, सरस्वती 1, सुलतानपूर 3, महार चिकना 2, चिखला 1, जळगाव जामोद शहर :1 , जळगाव जामोद तालुका : जामोद 1, भेंडवळ 1, खेर्डा 1, उमापूर 1, संग्रामपूर तालुका : वरवट 1, कवठळ 1, मोमीनाबाद 1, पातुर्डा 2, लोहारा 1, सोनाळा 2,खेर्डा 1, बावनबीर 1, परजिल्हा रिसोड जि. वाशिम 1, अंदूरा 1, वालसावंगी 1, नया अंदुरा 2, बाळापूर 1, दानापूर जि. जालना 1, जाफराबाद 1, वाशिम 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 903 रुग्ण आढळले आहेत.

6278 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात कोविड निदानासाठी 4092 नमुने घेण्यात आले आहेत. तसेच विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून 644 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 200664 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 27480 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 200664 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 34005 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 6278 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 247 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.