कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू! 790 पॉझिटिव्ह; बुलडाणा @ 202, मोताळा 127

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना, रुग्ण, जनसामान्यांच्या समस्या व शासकीय उपाययोजनांवर बारकाईने लक्ष देऊन असणाऱ्या बुलडाणा लाईव्हने प्रकाश टाकताच गत् 24 तासांत नमुने संकलन व चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला. या कालावधीत जिल्ह्यात 790 पॉझिटिव्ह आढळले. राजकीय वातावरण तापलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात कोरोनाचा झालेला स्फोट 19 एप्रिलच्या अहवालाचे ठळक वैशिट्य ठरले.गत् 24 …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना, रुग्ण, जनसामान्यांच्या समस्या व शासकीय उपाययोजनांवर बारकाईने लक्ष देऊन असणाऱ्या बुलडाणा लाईव्हने प्रकाश टाकताच गत्‌ 24 तासांत नमुने संकलन व चाचण्यांचा वेग वाढविण्यात आला. या कालावधीत जिल्ह्यात 790 पॉझिटिव्ह आढळले. राजकीय वातावरण तापलेल्या बुलडाणा विधानसभा मतदारसंघात कोरोनाचा झालेला स्फोट 19 एप्रिलच्या अहवालाचे ठळक वैशिट्य ठरले.
गत्‌ 24 तासांत मोठ्या संख्येने स्वॅब नमुने संकलित करण्यात आले. तसेच चाचण्यांवर भर देण्यात आला. परिणामी 7124 अहवाल प्राप्त झाले. यातील 6236 जण सुदैवी अर्थात निगेटिव्ह ठरले. दुसरीकडे 790 जण कोरोनाबाधित झाल्याचे आढळले. यातही बुलडाणा मतदारसंघातील कोविडचा प्रकोप भीषण असल्याचे चित्र आहे. 790 पैकी तब्बल 329 या पट्ट्यातील असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आघाडीवर असलेल्या बुलडाणा तालुक्यात 202 तर मोताळ्यात 127 रुग्ण आढळले. 4 वगळता इतर तालुक्यांतील प्रकोपदेखील कायम आहे. खामगाव 50, शेगाव 62, चिखली 54, मेहकर 57, नांदुरा 49, लोणार 53, जळगाव जामोद 47 अशी ही आकडेवारी आहे. या तुलनेत 4 तालुक्यांतील बाधितांचा आकडा आटोक्यात आहे. असे किमान आजचे चित्र आहे. देऊळगाव राजा 29, मलकापूर 33, सिंदखेड राजा 31 व संग्रामपूर 5 असा तेथील तपशील आहे.

6 जणांचा मृत्यू
दरम्यान, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची मालिका कायम आहे. बुलडाणामधील महिला रुग्णालयातील 4 जण उपचारादरम्यान दगावले. लद्धड रुग्णालय व खामगाव सामान्य रुग्णालयातील प्रत्येकी एक रुग्ण दगावला आहे.