कोरोनाला आवतन देणारा बुलडाण्याचा आठवडी बाजार भरणार नाय! उद्या व 28 फेब्रुवारीच्या‍ बाजाराला मनाई, जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः मूळ जागेसह राज्य महामार्गासह शहरातील दहाएक अंतर्गत रस्त्यांवर भरणाऱ्या व कोरोना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरणारा बुलडाण्याचा उद्या व पुढील आठवडी बाजार भरणार नाहीये! जिल्हा दंडाधिकारी एस.रामामूर्ती यांनी आज, 20 फेब्रुवारीला संध्याकाळी या संदर्भातील आदेश जारी केला. जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे …
 

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा )ः मूळ जागेसह राज्य महामार्गासह शहरातील दहाएक अंतर्गत रस्त्यांवर भरणाऱ्या व कोरोना वाढीसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरणारा बुलडाण्याचा उद्या व पुढील आठवडी बाजार भरणार नाहीये! जिल्हा दंडाधिकारी एस.
रामामूर्ती यांनी आज, 20 फेब्रुवारीला संध्याकाळी या संदर्भातील आदेश जारी केला.

जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे व बुलडाणा पालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला. यामुळे 21 व 28 फेब्रुवारीचा आठवडी बाजार भरणार नाही. मात्र बाजाराची मूळ जागा असलेल्या जागेत दुपारी 4 वाजेपर्यंत भाजीपाला विक्रीस मुभा देण्यात आली आहे. आठवडी बाजारात दूरच्या तालुक्यातील व पन्नास एक खेड्यातून येणारे लहान मध्यम व्यापारी, शेतकरी व जमा होणारी तुफानी गर्दी, लक्षात घेता लागू असलेल्या संचारबंदीचे पालन होणे अशक्य ठरले असते. तसेच सोशल डिस्टन्‍सिंगचा फज्जा उडाला असता. या सर्व बाबी लक्षात घेता बाजार बंद चा स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे.