कोरोनाला चॅलेंज देणे चिखलीत 900 जणांना पडले महागात!

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक बहाद्दर मात्र अजूनही नियम पाळण्यास टाळाटाळत करत आहेत. अशांना ही बेफिकीरी चांगलीच महागात पडली आहे. 21 फेब्रुवारीपासून आजपर्यंत 900 पेक्षा अधिक बेफिकीर लोकांवर कारवाई केल्याची माहिती चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी बुलडाणा लाइव्हला दिली. अशा नागरिकांकडून आजपर्यंत …
 

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली शहर व तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक बहाद्दर मात्र अजूनही नियम पाळण्यास टाळाटाळत करत आहेत. अशांना ही बेफिकीरी चांगलीच महागात पडली आहे. 21 फेब्रुवारीपासून आजपर्यंत 900 पेक्षा अधिक बेफिकीर लोकांवर कारवाई केल्याची माहिती चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी बुलडाणा लाइव्हला दिली. अशा नागरिकांकडून आजपर्यंत साडेतीन लाखांपेक्षा अधिक रक्कम दंड स्वरूपात वसुल करण्यात आली आहे.
कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्‍हा प्रशासनाकडून प्राप्‍त होताच तालुका प्रशासनाने त्वरित चिखली शहरात 10 ठिकाणी पथके नेमून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली. शहरातील राजाटॉवर, चिंच परिसर, नगर परिषद परिसर, राऊतवाडी, अशोक वाटिका परिसर, जिल्हा केंद्रीय बँक चौक, खामगाव रोड, बसस्टॅण्ड परिसरासह इतर गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणार्‍या नागरिक, दुकानदारांसह वाहनधारकांवर पालिका प्रशासन, तहसील प्रशासन तथा पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला जात आहे. यावेळी कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालयांसह दुकानांत नियमांची काटेकोरपणे पालन होते की नाही याचीसुद्धा तपासणी करण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन विनामास्क फिरणार्‍या तसेच इतर कारवाया मिळून जवळपास साडेतीन लाख रुपयांपर्यंतचा दंड वसूल झाला आहे. तब्बल 900 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान धार्मिक ठिकाणी तसेच इतर ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेता शहरातील मुख्य धार्मिक ठिकाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार अजितकुमार येळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलाबराव वाघ, पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत वायकोस यांनी स्वत: रस्त्यावर उतरून विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर कारवाई केली.

कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव अधिक वाढल्यामुळे नागरिकांनी स्वत:हून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. नागरिकांनी सहकार्य न केल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे कारवाई करणे क्रमप्राप्त झाले असून यापुढेदेखील कारवाई सुरूच राहील.

– अभिजीत वायकोस, मुख्याधिकारी नगर परिषद, चिखली