कोरोनाविषयक नियम पायदळी!; बुलडाणा नगरपालिका अन्‌ पोलिसांनी एकत्र येऊन शिकवला धडा!!; दिवसभरात तब्‍बल 88 हजार रुपये दंड वसूल!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंध शिथिल होताच कोरोनाविषयक नियम पायदळी तुडविणाऱ्यांची जणू स्पर्धा रंगली आहे. ही स्पर्धा त्यांच्याच जिवावर बेततेय आणि त्यांच्यामुळे इतरांच्या जिवालाही धोका निर्माण होतोय याची जाणीवही या महाभागांना नाही हे विशेष. अशा 45 महाभागांवर बुलडाणा नगरपालिकेने कारवाई करून तब्बल 68 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. कारवाईत …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कडक निर्बंध शिथिल होताच कोरोनाविषयक नियम पायदळी तुडविणाऱ्यांची जणू स्पर्धा रंगली आहे. ही स्‍पर्धा त्‍यांच्‍याच जिवावर बेततेय आणि त्‍यांच्‍यामुळे इतरांच्‍या जिवालाही धोका निर्माण होतोय याची जाणीवही या महाभागांना नाही हे विशेष. अशा 45 महाभागांवर बुलडाणा नगरपालिकेने कारवाई करून तब्‍बल 68 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. कारवाईत पोलीसही मागे नसून, त्‍यांनीही तब्‍बल 100 कारवाया करून 20300 रुपयांचा दंड जमा करून घेतला आहे.

बुलडाणा नगरपालिकेने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 19 जणांकडून प्रत्‍येकी 500 रुपये अशाप्रकारे 9500 रुपये दंड वसूल केला. मास्‍क न लावणाऱ्या 21 जणांकडून 4200 व एकाकडून 100 रुपये असा 4300 रुपये, संचारबंदीच्‍या काळात दुकान उघडे ठेवणाऱ्या एकाकडून 35 हजार रुपये, विनापरवानगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या दोघांकडून 20 हजार अशा प्रकारे एकूण 68000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. बुलडाणा शहर पोलिसांनीही तब्‍बल 100 कारवाया केल्या. त्‍यांच्‍याकडून 20300 रुपयांचा दंड वसूल केला.

कारवाईत नगरपालिकेच्‍या पथकात राजेश भालेराव, डिगांबर चाटे, जगराम पवार, जाकीर शेख लाल, जितेंद्र बेंडवाल, अक्षय अडाळे तर पोलिसांच्‍या पथकात सहायक पोलीस निरिक्षक अभिजीत अहिरराव, पोलीस उपनिरिक्षक अमित जाधव, पोहेकाँ रमेश पवार, पोहेकाँ विनोद गायकवाड, नापोकाँ पंजाब पैठणे, गजानन भंडारे, विठ्ठल काळुसे, नाजूकराव वानखेडे, दिनेश बकाले, पोहेकाँ सुनील मौजे यांनी केली.