कोरोना ः जिल्ह्यात नव्याने ५५ रुग्‍णांची भर, २४ रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 जुलैला 55 कोरोना पॉझिटिव्ह नव्याने समोर आले आहेत, तर 24 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयांतून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 184 बाधितांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3144 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 3089 अहवाल कोरोना निगेटिव्ह …
 
कोरोना ः जिल्ह्यात नव्याने ५५ रुग्‍णांची भर, २४ रुग्‍णांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 जुलैला 55 कोरोना पॉझिटिव्‍ह नव्याने समोर आले आहेत, तर 24 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयांतून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 184 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3144 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 3089 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 55 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 47 व रॅपिड टेस्टमधील 8 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 1129 तर रॅपिड टेस्टमधील 1960 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 3, शेगाव शहर : 1, देऊळगाव राजा शहर : 1, मेहकर तालुका : डोणगाव 1, मलकापूर शहर : 1, खामगाव शहर : 3, खामगाव तालुका : आडगाव 1, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 1, बोराळा 1, धानोरा 4, सिंदखेड राजा तालुका : चिंचोली 1, संग्रामपूर तालुका : टूनकी 2, काटेल 1, चिखली शहर : 2, चिखली तालुका : पळसखेड 1, कटोडा 1, मोताळा शहर :2, लोणार शहर : 5, लोणार तालुका : पिंपळनेर 2, गायखेड 1, गोत्रा 1, चोरपांग्रा 14, अंजनी खुर्द 1, चिंचाबा 1, शारा 1, भुमराळा 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 55 रुग्ण आढळले आहेत.

184 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आज 24 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 581615 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86034 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1088 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86881 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 184 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 663 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.