कोरोना ः दोन बळी, 53 नवे पॉझिटिव्‍ह, 109 रुग्‍णांवर उपचार सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आज, 17 जूनला दोन बळी घेतले. उपचारादरम्यान बुलडाण्याच्या काँग्रेसनगरातील 56 वर्षीय महिला व गांगलगाव (ता. चिखली) येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नवे 53 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 62 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या …
 
कोरोना ः दोन बळी, 53 नवे पॉझिटिव्‍ह, 109 रुग्‍णांवर उपचार सुरू

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाने आज, 17 जूनला दोन बळी घेतले. उपचारादरम्यान बुलडाण्याच्‍या काँग्रेसनगरातील 56 वर्षीय महिला व गांगलगाव (ता. चिखली) येथील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात नवे 53 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले असून, 62 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3100 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 3047 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 53 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 32 व रॅपीड टेस्टमधील 21 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 609 तर रॅपिड टेस्टमधील 2438 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : कोलवड 1, येळगाव 2, संग्रामपूर तालुका : शेगाव तालुका : मनसगाव 2, वरूड 1, पहुरपूर्णा 1, मोताळा तालुका : तालखेड 2, कोथळी 1, सावरगाव 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : तांदुळवाडी 1, उमाळी 1, उमरखेड 2, चिखली शहर : 4, चिखली तालुका : उंद्री 1, मलगी 1, पेनसावंगी 2, कव्हाळा 1, सिंदखेड राजा तालुका : रताळी 2, वर्दडी 1, किनगाव राजा 1, वडाळी 1, देऊळगाव राजा तालुका : जांभोरा 1, उंबरखेड 1, मेहकर शहर : 2, खामगाव शहर : 1, खामगाव तालुका : कवडगाव 1, कुंबेफळ 1, किन्ही महादेव 1, जनुना 1, दिवठाणा 3, बोरी अडगाव 1, जळगाव जामोद शहर : 5, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 1, लोणार तालुका : पिंप्री खंडारे 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 53 रुग्ण आढळले आहेत.

61 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात
आज 61 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 540332 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85371 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1421 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 540332 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 86133 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयांत 109 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 653 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.