कोरोना ः नव्या १३ बाधितांची भर, ७१ रुग्‍ण झाले बरे… वाचा आज कोणत्‍या गावात आढळलेत रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 8 जुलैला 13 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले आहेत. दिवसभरात 71 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या रुग्णालयांत 118 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3257 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3244 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, …
 
कोरोना ः नव्या १३ बाधितांची भर, ७१ रुग्‍ण झाले बरे… वाचा आज कोणत्‍या गावात आढळलेत रुग्‍ण

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 8 जुलैला 13 नवे कोरोनाबाधित रुग्‍ण समोर आले आहेत. दिवसभरात 71 रुग्‍णांना बरे झाल्याने डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या रुग्णालयांत 118 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3257 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3244 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 13 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 7 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 614 तर रॅपिड टेस्टमधील 2630 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
खामगाव तालुका : दिवठाणा 1, नांदुरा शहर : 2, जळगाव जामोद शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : सावखेड तेजन 1, जळगाव जामोद तालुका : वडगाव पाटण 1, आसलगाव 1, बुलडाणा शहर : 2, देऊळगाव राजा तालुका : मेंडगाव 1, चिखली शहर : 2, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 13 रुग्ण आढळले आहेत.

71 रुग्णांची कोरोनावर मात
आज 71 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 594090 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86269 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी 1688 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 87051 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयांत 118 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 664 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.