कोरोना ः नव्या ३० पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर, २१ जण झाले बरे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 5 जुलैला कोरोनाचे नवे 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, 21 रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयांत 156 बाधितांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1235 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1205 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 21 अहवाल …
 
कोरोना ः नव्या ३० पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर, २१ जण झाले बरे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 5 जुलैला कोरोनाचे नवे 30 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण आढळले असून, 21 रुग्‍णांना बरे झाल्‍याने डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्णालयांत 156 बाधितांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1235 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1205 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 21 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 11 व रॅपिड टेस्टमधील 19 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 560 तर रॅपिड टेस्टमधील 645 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 2, लोणार तालुका : भुमराळा 1, जळगाव जामोद शहर : 1, शेगाव शहर : 1, खामगाव शहर : 5, नांदुरा शहर : 1, सिंदखेड राजा शहर : 1, चिखली तालुका : बेराळा 17 अशाप्रकारे जिल्ह्यात 30 रुग्ण आढळले आहेत. आज 21 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

156 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 585475 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86151 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर कोरोना निगेटिव्ह झाल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 987 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 86970 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्‍णालयात 156 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.