कोरोना ः नांदुऱ्यात प्रशासन अलर्ट, बैठक घेऊन दिल्या कारवाईच्‍या सूचना, त्‍या बेफिकिरांना ठोठावणार दंड!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः कोरोना रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने 17 फेब्रुवारी रोजी तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात नांदुरा तालुका दक्षता कक्षाची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे वाचन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाययोजना सूचविण्यात आली. त्यात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा )ः कोरोना रुग्‍ण वाढत असल्याने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने 17 फेब्रुवारी रोजी तहसीलदार राहुल तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात नांदुरा तालुका दक्षता कक्षाची तातडीची बैठक घेण्यात आली.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्‍या आदेशाचे वाचन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून उपाययोजना सूचविण्यात आली. त्‍यात पाचपेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. सर्व उत्सव, लग्‍न समारंभात 50 व्यक्तींना उपस्थित राहता येईल. सार्वजनिक ठिकाणी मास्‍कचा वापर व सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक राहील. 5 वी ते 9 वीपर्यंतच्‍या सर्व शाळा बंद राहतील. आठवडे बाजार दुपार 4 नंतर बंद राहील. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल. दुकानदार, व्यापारी, अडते, भाजीपाला व फळविक्रेते यांचे स्‍वॅब तपासणी करणे, रॅपिड टेस्ट वाढवून रोज 150 ते 200 नागरिकांची चाचणी करणे, तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना लस देणे, तालुक्यात अधिकारी व कर्मचारी यांचा समन्वय सेल निर्माण करून बधितांची माहिती घेऊन करणे, बाधित कुटुंबातील व शेजारील  व्यक्तीच्या चाचणी करणे, शहर व गावपातळीवर प्रचार व प्रसार माध्यमांद्वारे नागरिकांत जागृती करणे आदी उपाययोजना करण्याचे ठरले.

…तर 500 रुपयांचा दंड

उत्सव, लग्न समारंभात शासनाने ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त गर्दी झाल्यास कारवाई करावी. मास्‍कचा वापर न करणाऱ्यांवर तसेच लग्‍न समारंभात गर्दी केल्यास 500 रुपयांचा प्रतिव्यक्ती दंड आकारण्यात येणार आहे. बैठकीत तहसीलदार राहुल तायडे, गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, पोलीस निरीक्षक श्री. नाईकनवरे, नगर परिषदेचे श्री. नाफडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खंडारे, डॉ. बेंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, आरोग्य विभाग, तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.