कोरोना ः ५९ रुग्‍णांची नव्याने भर; ९६ जण झाले बरे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 4 जुलैला 59 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर 96 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या रुग्णालयात 147 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2714 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2655 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, …
 
कोरोना ः ५९ रुग्‍णांची नव्याने भर; ९६ जण झाले बरे!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 4 जुलैला 59 नव्या कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली, तर 96 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या रुग्णालयात 147 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2714 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2655 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 59 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 46 व रॅपिड टेस्टमधील 13 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 455 तर रॅपिड टेस्टमधील 2200 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 2, देऊळगाव राजा तालुका : पिंपरी आंधळे 2, मेहकर शहर : 1, मलकापूर शहर : 1, खामगाव शहर : 1, खामगाव तालुका : पिंपळगाव राजा 1, जळगाव जामोद शहर : 4, संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, चिखली शहर : 3, चिखली तालुका : कटोडा 1, बेराळा 8, संजोळ 1, लोणार शहर : 6, लोणार तालुका : चोरपांग्रा 25, नांदुरा शहर :1, परजिल्हा जालना 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 59 रुग्ण आढळले आहेत.

96 रुग्‍णांची कोरोनावर मात
आज 96 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 584270 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86130 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1269 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 86940 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 147 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 663 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.