कोरोना अपडेट्‌स… जिल्ह्यात नव्या 62 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 1 जुलैला नव्या 62 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे, तर 44 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्णालयात 96 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2639 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2577 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 62 अहवाल पॉझिटिव्ह …
 
कोरोना अपडेट्‌स… जिल्ह्यात नव्या 62 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 1 जुलैला नव्या 62 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली आहे, तर 44 रुग्‍णांना डिस्‍चार्ज मिळाला आहे. सध्या रुग्णालयात 96 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2639 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 2577 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 62 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 56 व रॅपिड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 682 तर रॅपिड टेस्टमधील 1895 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
खामगाव शहर : 1, बुलडाणा शहर : 3, बुलडाणा तालुका : सागवण 1, जळगाव जामोद तालुका : बोराळा 2, निंभोरा 1, सताळी 1, आसलगाव 1, टाकळी पारस्कर 1, मोताळा तालुका : टाकळी 1, महाळुंगी 1, पुन्हई 1, नांदुरा तालुका : सानपुडी 1, मलकापूर शहर : 1, मलकापूर तालुका : उमाळी 1, लासुरा 1, देऊळगाव राजा शहर : 9, देऊळगाव राजा तालुका : कुंभारी 1, भिवगण 5, किन्ही पवार 12, गोळेगाव 1, पिंपळगाव चि. 1, मंडपगाव 1, लोणार तालुका : पिंपळनेर 2, चिखली शहर : 3, चिखली तालुका : मुंगसरी 1, बेराळा 1, सवणा 1, सावरगाव 1, हिवरा खुर्द 1, मनुबाई 1, अमडापूर 1, उत्रादा 1, परजिल्हा बाळापूर 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 62 रुग्ण आढळले आहेत.

96 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 576357 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85978 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1576 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 86737 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 96 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 663 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.