कोरोना अपडेट : नवे 37 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण, एकाचा मृत्‍यू, 60 जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 16 जूनला नव्या 37 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, उपचारादरम्यान पिंपळगाव (ता. चिखली) येथील 84 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 60 जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2627 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2590 अहवाल कोरोना …
 
कोरोना अपडेट : नवे 37 पॉझिटिव्‍ह रुग्‍ण, एकाचा मृत्‍यू, 60 जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 16 जूनला नव्या 37 पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची भर पडली असून, उपचारादरम्यान पिंपळगाव (ता. चिखली) येथील 84 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 60 जणांना रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2627 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2590 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 37 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 23 व रॅपीड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 239 तर रॅपिड टेस्टमधील 2351 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 2, बुलडाणा तालुका : साखळी बुद्रूक 1, संग्रामपूर तालुका : करमोडा 1, शेगाव शहर : 1, मलकापूर तालुका : दाताळा 1, चिखली तालुका : भालगाव 1, दहीगाव 1, अन्वी 1, उंद्री 1, धानोरी 1, कटोडा 1, वरूड 1, सिंदखेड राजा तालुका : असोला जहाँगीर 1, शिवणी टाका 1, देऊळगाव राजा तालुका : भंडारी 1, भिवगण 1, नांदुरा शहर : 3, नांदुरा तालुका : निमगाव 1, खामगाव शहर : 3, खामगाव तालुका : दिवठाणा 3, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : बोराळा बुद्रूक 2, धानोरा 2, मडाखेड 1, लोणार शहर : 1, लोणार तालुका : कापडशिंगी 1, भुमराळा 1, परजिल्हा मादनी (जि. जालना) 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 37 रूग्ण आढळले आहे.

119 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आज 60 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 537285 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 85310 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1476 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 537285 आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 86080 कोरोनाबाधित रुग्ण असून, सध्या रुग्णालयात 119 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 651 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.