कोरोना अपडेट : ३ नवे रुग्‍ण दाखल, ४ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 जुलैला कोरोनाचे तीन नवे रुग्ण समोर आले असून, दिवसभरात चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या रुग्णालयांत 16 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1109 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1106 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून …
 
कोरोना अपडेट : ३ नवे रुग्‍ण दाखल, ४ जणांना डिस्‍चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 26 जुलैला कोरोनाचे तीन नवे रुग्‍ण समोर आले असून, दिवसभरात चार रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला. सध्या रुग्‍णालयांत 16 रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1109 अहवाल प्राप्त झाले आहेत. पैकी 1106 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 5 व रॅपीड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 730 तर रॅपिड टेस्टमधील 376 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
शेगाव तालुका : कालखेड 1, सिंदखेड राजा तालुका : मलकापूर पांग्रा 1, चिखली तालुका : गोद्री 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 3 रुग्ण आढळले आहे. आज 4 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे.

16 सक्रिय रुग्ण
आजपर्यंत 629864 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86552 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1311 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87240 कोरोनाबाधित रुग्ण असून,सद्यःस्थितीत कोविडचे 16 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.